गणेशोत्सवासाठी आलेल्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

फुले शाहू आंबेडकर
0
पाचोरा (जळगाव) : येथील पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या व नांदेड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय पोलिसपुत्राचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ७) सायंकाळी घडली 
पाचोरा  येथील पोलिस उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा आदित्य हा नांदेड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. गणेशोत्सव असल्‍याने तो पाचोरा येथे आला होता. दरम्यान, बुधवारी (ता. ७) सायंकाळी पाणी भरण्यासाठी विजेचा पंप सुरू करण्यासाठी गेला असता त्यास  विजेचा धक्का लागून तो जागीच मृत झाला. यामुळे पोलिस वसाहतीत शोककळा पसरली. मृत आदित्यवर गुरुवारी (ता. ८) सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलिस वसाहतीतील असुविधा व समस्यांबाबत यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default