धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या मोहननगर या परिसरातून गेल्या तीन दिवसांपूर्वी घरमालक उपचारादरम्यान बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली होती. या संदर्भात आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदविण्यात आली होती. या घरफोडीचा तपास करत असताना आझादनगर पोलिसांना धुळे शहरातील सराईत गुन्हेगाराने ही घरफोडी केली असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगारावर धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
शुक्रवार, सप्टेंबर ०९, २०२२
0
धुळे : धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी झाली होती. या घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून रोख रक्कमेसह दुचाकी ताब्यात घेतली आहे.
Tags
