घटना भर वस्तीत सायंकाळी सहाच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान चोरीचा हा सर्व थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. साेमवारी सायंकाळच्या सुमारास पाऊस पडत असताना ही घटना घडली.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी - साेमवारी सायंकाळी पाऊस पडत हाेता. सटाणा नाका येथील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये दाेन जण त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून आले. ते दाेघेही तरुण हाेते. त्यांनी एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवत पैशांची मागणी केली. त्यानंतर सुमारे लाख रुपये घेऊन त्यांनी धूम ठाेकली. या घटनेनंतर पाेलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसाशचोरट्यांचा शोध घेताहेत.
