पालकांनो सावधान! ८ महिन्यांच्या बाळाने गिळलं नेलकटर; नाशकातील धक्कादायक घटना

फुले शाहू आंबेडकर
0

नाशिक: लहान मुलांना सांभाळण किती कठीण काम असतं हे पालकांना चांगलचं माहिती आहे. लहान मुलांना आपण काय खातोय, कशाला हात लावतोय हे काही कळतं नाही. त्यामुळे १ ते २ वर्षापर्यंत मुलांना खूप जपावं लागतं. मात्र, अशातही जर पालकांचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर ते किती धोक्याचं ठरु शकतं याचं एक उदाहरण नाशिकमधून समोर आलं आहे.

नाशिकरोड परिसरातील के जी मेहता येथील एका आठ महिन्याच्या बाळाने पालकांचं लक्ष नसताना नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. लहान मुलाने नेलकटर गिळल्याचं कळताच घरातील लोक चांगलेच घाबरले होते.

शिवाय जिल्हा शासकीय रुग्णालयात  उपचार शक्य नसल्याने मेडिकल कॉलेजमध्ये या लहान बाळाला घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करत नेलकटर घशातून बाहेर काढल्यावर पालकांचा जीव भांड्यात पडला.

डॉक्टरांनी केलेल्या एक तासाच्या प्रयनानंतर या बाळाला कोणतीही शारीरिक इजा ना होता नेलकटर बाहेर काढल्यामुळे बाळाच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले. तसंच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन देखील पालकांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default