राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. यात जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. एकजण मशीदजवळ झोपलेले असतांना ताब्यात घेतले आहे. परंतू यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.
संबंधीत व्यक्ती जालन्यातील
ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो गेल्या काही दिवसांपासून जळगावात होता. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय 32 वर्षे, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
