धक्‍कादायक..मित्रांना सांगून प्रेयसीवर केला प्राणघातक हल्ला

फुले शाहू आंबेडकर
0
पिंपरी– चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरु प्रियकराने आपल्या काही मित्रांना सुपारी देऊन स्वतःच्याच प्रेयसीवर प्राण घातक  हल्ला केला आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी एका सार्वजनिक महिला स्वच्छता गृहामध्ये बळजबरीने शिरून प्रियसीवर ब्लेडने सपासप वार केले आहेत.
पिंपरी– चिंचवड शहरातील आकुर्डी रेल्वे लाईन परिसरामध्ये राहणारी एक 27 वर्षाची पीडित तरूणी या हल्‍ल्‍यात अतिशय गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या वायसीएम रुग्णालयामध्ये  उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात पीडितेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी ्् चेतन या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रियकरा आरोपीला निगडी पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.
चेतन आणि पीडित तरुणीचे प्रेम संबंध होते. मात्र, पिडित तरुणी ही गरीब घरातली असल्याने चेतनने तिला लग्नास नकार दिला. मात्र, त्यानंतरही पीडित तरुणी चेतनकडे लग्नाचा आग्रह धरत होती. यामुळे आपल्या काही मित्रांना सुपारी देऊन स्वतःच्याच प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला आहे. हल्‍ला करताना सार्वजनिक महिला स्वच्छता गृहामध्ये ब्‍लेडने वार केले. तसेच अंगावर दारू टाकून आणि डोळ्यांवर तसेच गुप्तांगावर लाल मिरची पावडर टाकून हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे पीडित प्रेयसी आणि तिचे कुटुंब मोठ्या प्रमाणात धास्तावले असून या हल्ल्यातील बाकी फरार हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी पीडितेच्या बहिणींनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default