राष्ट्रीय कौंटूबिक आरोग्य यंत्रणेच्या अहवालामुळे धुळे जिल्ह्यातील सर्वच महिलांचा अपमान झाला. असे म्हणत राज्यामध्ये धुळ्यातील महिला या चेष्ठेचा विषय झाला असून हा अहवाल म्हणजे धुळे जिल्ह्याचा अपमान आहे; असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्या महिला व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच सदर अहवाल कोणत्या माहितीच्या आधारे तयार केला. याचा खुलासा राज्य सरकारने केला पाहिजे.
अहवाल मागे घ्या
धुळे जिल्ह्याची आकडेवारी कुठून आणली, कोणी दिली, कोणते निकष लावून सर्व्र्हे केला? ही देखील माहिती जनतेसमारे येणे गरजेचे असल्याचे म्हणत शिंदे - फडणवीस सरकारने जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असून सदर अहवाल त्वरीत मागे घ्यावा; अशी मागणी राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी केली आहे.
