विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0

विवाहतेच्या मृत्यू प्रकरणी पाेलीसांनी नाशिक  जिल्ह्यात चार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याचा आणि त्यामुळे विवाहतेचा मृत्यू झाल्याचा आराेप नातेवाईकांनी डाॅक्टरांवर केला हाेता.
नाशिक येथील चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील प्रियंका निर्भवने या विवाहित महिलेची गेल्या महिन्यात प्रसुती झाली. त्यावेळी प्रियंका यांस मुल झाले. मात्र त्यावेळी चुकीची शस्त्रक्रिया स्थानिक डॉक्टरांनी केल्यामुळे महिना भरानंतर तिचा मृत्यू झाला असा आराेप करीत तिच्या नातेवाईकांनी केला.
नातेवाईकांनी थेट रुग्णवाहिका चांदवड पोलीस स्थानकात आणली. यावेळी नातेवाईंनी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्यांना जो पर्यंत अटक करत नाही तो पर्यंत मृतदेह येथून घेऊन जाणार नसल्याचा पवित्र घेतला. तसेच पोलीस स्थानकात ठाण मांडले हाेते.
यानंतर रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातून अहवाल आल्यावर मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात चार डॉक्टरांवर चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default