लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील गेल्या आठवड्यामध्ये मंगळवार या बाजाराच्या दिवशी वरखेडी रोड परिसरामध्ये अवैधपणे जनावरांचा बाजार भरवण्यात आला होता. या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत बाजार भरवणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज देखील मंगळवारी गेल्या आठवड्याप्रमाणे जनावरांचा बाजार भरवला जाऊ नये; यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यात आली आहे,
पोलिस असल्याने शुकशुकाट
बाजार भरवल्या जाणाऱ्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे सकाळपासूनच पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी वेळोवेळी पाहणी करण्यासाठी पोहचत असल्यामुळे आज परिसरामध्ये जनावरांचा बाजार भरवणारे पोहोचले नसल्यामुळे शुकशुकाट बघावयास मिळत आहे.
