ताई-भावोजींचं भांडण, पण हल्ला थेट मेव्हण्यावर! कटरने वार, हवेत गोळीबार, मालेगावात थरार

फुले शाहू आंबेडकर
0
नवरा-बायकोच्य  भांडणाचा राग मेव्हण्यावर निघाल्याची घटना उघडकीस आलीय. मालेगावात एकाने आपल्या बायकोच्या भावावर जीवकेला. या हल्ल्यात मेव्हणा गंभीर जखमी झालाय.  जखमी मेव्हण्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या मालेगाव पोलिसांकडून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी कटरने हल्ला  करण्यात आला होता. शिवाय यानंतर हल्लेखोरांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केल्याचं सांगितलं जातंय.

मालेगावच्या सर्वे क्रमांक 55च्या निहाल नगर भागात ही थरारक घटना घडली. पत्नी-पत्नीच्या कौटुंबिक वादातून शालकाने मेव्हण्यावर कटरने हल्ला केला. या हल्ल्यात मेव्हणा गंभीररीत्या जखमी झाला.

भावोजींनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेव्हण्याचं नाव सरताज सत्तार शेख असं आहे. सरताजला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, भावोजींनी मेव्हण्यावर हल्ला घडवून आल्याचा आरोप केला जातोय. या जीवघेण्या हल्ल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या जमावाला पांगवण्यासाठी हल्लेखोरांनी हवेत गोळीबार देखील केल्याचं लोकांचं म्हणणंय.

एक जिवंत तर एक फायर केलेलं काडतूस कव्हर केल्याचं फोटोही व्हायरल झालेत. मालेगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतलीय. हल्लेखोरांविरोधात मालेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यातचं काम सुरु होतं.

खरंच गोळीबार झाला की नाही, याचा तपास पोलिसांनी केला जातोय. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. संपूर्ण तपासाअंती गोळीबार प्रकरणाचाही गुन्हा दाखल करण्यात येईल, असं वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

मेव्हण्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला. मात्र या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय. काही काळ मालेगावच्या सर्वे नंबर 55 च्या निहाल नगर भागात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पाहणी करुन पोलिस आता पुढील तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default