कजगाव येतील भूषण नामदेव पाटील हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून गावातील बस स्टँडसमोर असलेल्या गावठाण गट क्रमांक- १३१ समोरचे अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करत आहे. या संदर्भात त्याने अनेकदा निवेदने देऊन देखील स्थानिक ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही. या संदर्भात कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपण आत्मदहन करणार आहोत, असा इशाराही भूषण पाटील या तरुणाने दिलेला होता.
दिलेल्या तक्रारी, निवदेनाची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात नाही असे तरुणाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तक्रारदार भूषण पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:च्या अंगावर सोबत आणलेल्या कॅनमधून पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
