कापसाला जळगावात मिळाला उच्‍चांकी १६ हजार भाव; बळीराजा आनंदी

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली. दरम्‍यान चतुर्थीच्‍या मुहूर्तावर उच्‍चांकी १६ हजार रूपये प्रतिक्‍वींटल इतका दर मिळाला आहे. यामुळे बळीराजामध्‍ये  आनंदाचे वातावरण आहे. 
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदील सुरवात होत असते. त्‍यानुसार जळगाव जिल्‍ह्यात देखील सुरवात झाली आहे. या मुहूर्तावर बोदवड  येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथे १४ हजार ७७२ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस  खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजारांचा भाव दिला.

दहा हजाराच्‍या वरच दर

जिल्‍ह्यातील बहुतांश ठिकाणी कापूस खरेदीला सुरवात झाली. यात सर्वच ठिकाणी दहा हजार रूपयांच्‍या वर दर मिळाला आहे. यामध्‍ये सातगाव डोंगरी येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये, खेतिया येथे यंदाच्या हंगामातील पहिल्या कापूस खरेदीला १० हजार ७०१ रुपये भाव मिळाला. तर वडाळी (ता. शहादा) येथील शेतकरी भरत पाटील यांच्या कापसाला शुभ मुहूर्त भाव १० हजार ७०१ रुपये क्विंटल देण्यात आला. धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये मुहूर्ताला ११ हजार १५३ रुपये असा भाव मिळाला. येथे एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default