गायकवाड आणि पवार या दोघांनी बनावट ओळखपत्र दाखवून ते रेल्वेमध्ये टीसी व सरकारी नोकर असल्याचा दावा करु लागले. मात्र, त्यांच्या बोलण्यावरून त्रिपाठी यांना संशय आला म्हणून ही बाब त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळवली. तात्काळ तेथे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पोहोचून रेल्वे विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केली.
लोहमार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत दोन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे रेल्वेचे दोन बनावट ओळखपत्र व दोन मोबाईल फोन मिळून आले. त्यानंतर ही पोलिसांनी त्याला विचारणा केली असता ते दोघे पोलिसांना खरे टीसी असल्याचं सांगत होते. पोलीस ही एकावेळी चक्रावले होते. दोन्ही आरोपींना टीसीचं ओळखपत्र कसं मिळालं याचा तपास सुरु करण्यात आला आहे. तपास अधिकारी अर्चना दुसाणे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
अर्चना दुसाणे यांनी संतोष त्रिपाठी आणि विष्णू सांबरे या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कसारा रेल्वेस्थानकावर दोन्ही आरोपींच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर हा प्रकार उघडीकस आला, अशी माहिती दिली. गायकवाड आणि पवार हे आरोपी नेमक्या कोणत्या उद्देशानं तोतया टीसी बनले होते याचा तपास करण्यात आहे.
