मुलं चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरली अन् एकच गोंधळ उडाला; वाचा, नेमकं काय घडलं?

फुले शाहू आंबेडकर
0
राज्यभरात मुल पळवणाऱ्या टोळीचा अफवा पसरली आहे. याची प्रचिती जालन्यातील  भोकरदनमध्ये देखील पाहायला मिळाली. भोकरदन शहरात अपघात झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली . या अपघातानंतर ११ वर्षीय मुलगा कारच्या बोनटला लटकल्याने कार चालकाने शहरातून मुलासह ही कार सहा किलोमीटर सुसाट वेगाने पळवली. सदर दृश्य पाहून शहरात मुलं पळवणारी टोळी दाखल झाल्याची अफवा  वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भोकरदन परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या भोकरदन शहरातील शासकीय विश्राम गृहाजवळ स्कुटी आणि कारचा अपघात झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली. या अपघातानंतर ११ वर्षीय मुलगा बोनटला लटक्याने कार चालकाने शहरातून मुलासह ही कार ६ किलोमीटर सुसाट वेगाने पळवल्याची घटना घडली. त्यानंतर शहरातील नागरिकांनी दृश्य पाहून मुलं पळवणारी टोळी दाखल झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शहरातील पोलीस ठाणे ते सिल्लोद नाका परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केल्याने एकच खळबळ उडाली.
शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्याने नागरिक रस्त्यावर उतरल्याने एकच गर्दी केल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी अपघात असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच कार चालकाला भोकरदन -सिल्लोड महामार्गावरील मुठाड फाट्यावरून ताब्यात घेतले. याची माहिती देत पोलिसांनी नागरिकांना शांतेत घरी जाण्याचे आवाहन केले. तसेच गर्दी पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, नागरिकांनी या कालचा पाठलाग करत चालकाला मारहाण करत मुलाची सुटका करत कार देखील फोडल्याची माहिती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default