तहाराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल नंदन यांना अटक

फुले शाहू आंबेडकर
0
सटाणा : येथील तहाराबाद ग्रामपंचायतीची खळबळजनक बातमी समोर आली आहे. सटाण्याच्या ताहराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल नंदन यांना पोलिसांनी  अटक केल्याने खळबळ माजली आहे. विकासकामांसाठी १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार केल्याच्या आरोप शीतल यांच्यावर करण्यात आला आहे 

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके,पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटकर यांना जामीन मंजूर झाला. पण ग्रामविकास अधिकारी ठोके यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.

सरपंच शीतल ठोके चार महिन्यांपासून फरार होत्या.त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्या जायखेडा पोलिसांना शरण आल्या.भ्रष्टयाचारप्रकरणी थेट सरपंचला अटक झाल्याने लोकप्रतिनिधींनी मोठा धक्का बसला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default