धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आठवड्यातील मंगळवार या दिवशी जनावरांचा मोठा बाजार भरतो. या बाजारामध्ये जिल्ह्यातच नाही तर इतर राज्यांमधून देखील जनावरे विक्रीसाठी आणली जातात. परंतु आता जनावरांवर सध्या लंपी स्किन या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जनावरांची खरेदी-विक्री बंद
मंगळवार, सप्टेंबर ०६, २०२२
0
धुळे : जिल्हाभरामध्ये पशुंवर विषाणूजन्य लंपी स्कीन डिसीज या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. परंतु या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनातर्फे ही खरेदी विक्री आता सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.
Tags
