धुळे जिल्‍ह्यातील जवान मनोहर पाटील यांना वीरमरण

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असतांना तेथील हवामानाच्या दुष्परिणामांमुळे झालेल्या त्रासाने  धुळ्यातील न्याहळोद येथील जवान मनोहर रामचंद्र पाटील (वय 42) यांना वीरमरण आले. 
सियाचिन हा अंत्यत बर्फाळ प्रदेश आहे. जगातील सर्वात उंच युध्द क्षेत्र असलेले व नेहमी उणे तापमान, ऑक्सीजनची कमी, हा सर्व बर्फाच्छादीत प्रदेश आहे. या ठिकाणी कर्तव्य बजावणे म्हणजे शत्रुपेक्षा नैसर्गिक वातावरणाचा सामना करणे जिकरीचे असल्याने याला युध्द क्षेत्रच म्हणता येईल. याच ठिकाणी जवान मनोहर पाटील हे कार्यरत होते.

वीस वर्ष सेवा

शहिद मनोहर रामचंद्र पाटील हे 9 जानेवारी 2002 रोजी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. भारतीय सैन्यात हवालदार या पदावर ते कार्यकर होते. सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असतांना 16 जुलै रोजी तेथील हवामानाच्या दुष्परिणामामुळे त्यांना त्रास होत असल्याने त्याच दिवशी तातडीने हेलिकॅप्टरद्वारे त्यांना उपचारासाठी दिल्ली 

दोन महिन्‍यांपासून सुरू होते उपचार

मनोहर पाटील यांना तीव्र डोकेदुखी व उलटीचा त्रास झाल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळे न्याहळोदसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. शहीद जवान मनोहर पाटील यांचे पार्थिव दिल्लीहून विशेष विमानाने पुणे येथे आणण्यात येणार असून तेथून रुग्णवाहिकेने न्याहळोद येथे आणण्यात येणार आहे. जवान मनोहर पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 9 वर्षांची मुलगी, आई- वडील व 4 भाऊ असा परिवार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default