संतापजनक: बापच बनला हैवान; पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पत्नीलाही मारहाण

फुले शाहू आंबेडकर
0

वर्धा: बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नराधम बाप १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन  अंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली आहे.

वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या एका गावात एक नराधम बापाने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार  करत होता. शिवाय मुलीवरती करत असलेला लैंगिक अत्याचाराची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून पत्नीलाही मारहाण करायचा. मात्र, सततचा अत्याचार असाह्य झालेल्या मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या शिक्षिकेला सांगितल्यामुळे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवासी नराधम बाप मागील तीन वर्षांपासून स्वता:च्या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता. एवढंच नव्हे तर मुलीसोबत करत असलेल्या अत्याचाराची वाच्यता बाहेर होऊ नये म्हणून आपल्या पत्नीलाही मारहाण करायचा.

पीडित मुलगी ही बारावीत शिकत आहे. अखेर पीडितेने याबाबतची माहिती तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली. शिक्षिकेने घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ जिल्हा बाल संरक्षण समिती  व चाईल्ड लाईन केंद्राला याबाबत कळविले. चाईल्ड लाईनचे थेट अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी तत्काळ याप्रकरणात पीडितेच्या बयाणावरुन नराधम बापाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केलीय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल गाडे करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नराधम बापाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default