पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ सप्टेंबर रोजी मीरा शशिकांत गंभीरे (५०, ध्रुव नगर, गंगापूर शिवार, नाशिक) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाच्या लॉकची चावी अज्ञाताने चोरली. त्या चावीने लॉक उघडून घरातून सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
घरफोडी करणारा गजाआड, 'इतक्या' किमतीचे दागिने हस्तगत
शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०२२
0
घरफोडी करणाऱ्या संशयितास ताब्यात घेण्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास मोठे यश आले आहे. संशयिताकडून ९ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत...
Tags
