आश्रय केंद्रातील केंद्रातील मुलींचे वय १५ आणि १६ आहे. गेल्या महिन्यांमध्ये मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे आणि गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या आश्रय केंद्रात या मुली वास्तव्याला होत्या.
दोन्ही मुलींसह गेल्या महिन्यात आणखी एका मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे केंद्रात एकच खळबळ उडाली होती. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. एक पीडित मुलगी नववीला आहे. तर दुसऱ्या दोन मुली या इयत्ता दहावीला आहेत. या तिन्ही मुलींना शाळेतर्फे आयोजित परीक्षा देण्याची मुभा दिली आहे.
पीडित मुलींना प्रसूतीपर्यंत केंद्रात राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यानंतर पालकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येतो. सदर केंद्रात १८ वर्षापर्यंत राहण्याची व्यवस्था आहे. दरम्यान, किशोयवयीन मुले अधिक भावनिक असतात.
आरोग्याबाबतचे स्थितांतर घडत असते. मुलांना आरोग्यविषयी मुलांना परिपूर्ण ज्ञान नसते. या वयात मुले मानसिक समस्याचा विळख्यात अडकण्याची दाट शक्यता असते. अल्पवयीन मुले लैंगिक संबध वा वाईट गोष्टींच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज असते, असे मत महिला व बाल कल्याण अधिकारी व आश्रय केंद्रातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
