अमरावती रवी राणा यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना पोलिस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले . त्यामुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली होती. आमदार रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'अमरावती जिल्ह्यात केवळ राणा दाम्पत्यच आपल्यावर आरोप करत आहेत. महापालिका आयुक्त यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळेच आपल्यावर तथ्यहिन आरोप करत आहे. त्यामुळे मला त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही'.
काय म्हणाले होते रवी राणा ?
'अमरावतीचे पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी अमरावतीमध्ये वसुली पथक नेमले होते. त्यामुळेच अमरावती गुन्हे वाढले, दंगल झाल्या. अमरावतीमध्ये कोल्हे यांची हत्या झाली. आज अमरावतीमध्ये रोज गुन्हे होत आहेत. अवैध धंदे चालतात. हत्या होत आहेत. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्याच्यातून काही पैसा उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवला आहे, असे गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी अमरावतीचे पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर केले
