कोरोनाच्या काळात सर्वच रेल्वे गाड्या बंद झाल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू रेल्वे सुरू झाल्या. परंतु, गेल्या अडीच वर्षांपासून भुसावळ देवळाली पॅसेंजर ही बंदच होती. येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
४० टक्के तिकिट दर वाढ
देवळाली पॅसेंजरला रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. यामुळे तिकीट दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. भुसावळहुन सुटणाऱ्या या देवळाली पॅसेंजरचे पूर्वी भुसावळ देवळालीपर्यंतचे तिकीट ५५ रूपये होते. मात्र, ४० टक्के तिकीट दरवाढीमुळे भुसावळ ते देवळालीचे तिकीट ५५ रुपयांवरून ९५ ते १०० रुपयांच्या घरात आकारण्यात येणार आहे. तसेच जळगाव ते चाळीसगावचे तिकीट हे पूर्वी २५ रूपये होते ते ५० रूपये होण्याची शक्यता आहे.
