शिवराज चाकूरकर यांनी केलेल्या विधानाचे पडसाद धुळ्यात उमटताना दिसून येत आहेत. काँग्रेसचे माजी गृहमंत्री चाकूरकर यांनी हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला जिहाद शिकवल्याच्या वादग्रस्त विधानावर आक्रमक होत महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्यावतीने शिवराज चाकूरकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून तसेच प्रतिमा जाळून तीव्र निषेध केला आहे,
चाकूरकर विरोधात घोषणाबाजी
यावेळी या निषेध आंदोलनादरम्यान महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे. यावेळी सर्व निषेधकर्त्या आंदोलकांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या माजी गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
