लांबे वडगावयेथील सोमसिंग देवसिंग राजपूत यांचे लांबे वडगाव शिवारात शेत आहे. लखन बालु पाटील हा शेतगडी म्हणून काम करतो. आज (ता.4) शेतगडी लखन हा शेतात विहीरीवरील पाण्याची मोटार सुरू करण्यास गेला असता शेतातील घराचे कडीकोंडा तुटलेला दिसला. ही माहिती मिळाल्यानंतर सोमसिंग राजपूत यांनी शेतात धाव घेतली. सोमवारच्या सायंकाळी 7 ते आजच्या सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरा प्रवेश करून वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सोमसिंग राजपूत यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४२ हजाराचा ऐवज लांबविला
चोरट्यांनी घरातून 15 हजार रूपये किंमतीची गॅस शेगडी, घरगुती उपयोगी भांडी तसेच किराणा सामान भरलेल्या बरण्या, 20 हजार रूपये किंमतीचा एसी, 3 हजार रूपये किंमतीचे इनव्हर्टर मशिन, 2 हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटर व 400 रूपये किंमतीचे 5 लिटर तेलाची कॅन असा सुमारे 42 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरला.
