फार्म हाऊसवर पाेलीसांना पाहताच प्रतिष्ठितांची उडाली घाबरगुंडी; पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत एका व्हीआयपी जुगार अड्यावर कारवाई केली आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी  दिली. 
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत सुरु असलेल्या व्हीआयपी जुगार अड्यावरील कारवाईत जिल्ह्यातील प्रतिष्ठीतांना जुगार खेळताना पकडले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या कारवाई तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे
औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखा आणि शिल्लेगाव पोलिसांनी एका फार्म हाऊसवर संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत 25 लाख रोख रक्कम व पाच चार चाकी लक्झरी गाड्यासह एकूण 1 कोटी 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default