लातुरात सशस्त्र दरोडा; पिस्तुलाचा धाक दाखवून ३ कोटींची लूट

फुले शाहू आंबेडकर
0
लातूर : लातूर  शहरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली. कातपूर रोडवरील कन्हैयानगर येथील एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दरोडा टाकला. चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून २ किलो ४३६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख २ कोटी २५ लाख असा २ कोटी ९८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एरव्ही शांत असलेल्या लातूर शहरात एकच खळबळ उडाली. 
कातपूर रोडवरील कन्हैयानगर येथील आक राजकमल अग्रवाल यांच्या घरात पहाटे २.३० च्या सुमारास ५ चोरट्यांनी प्रवेश केला. किचन रूममधून घरात आलेल्या चोरट्यांनी तळघरात आकाश अग्रवाल यांचे वडील झोपले होते. त्यांच्या बेडरूमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी कत्ती, चाकू, पिस्टलचा धाक दाखवून रोख २ कोटी २५ लाख रूपये आणि २ हजार ४३६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
तत्पूर्वी घरातील सर्वांना एका रूममध्ये कोंडले आणि चोरटे कंपाऊंडवरून उडी मारून पळून गेले.या घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलिस ठाण्याचे प्रभारी खंदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
सदर घटनेच्या संदर्भाने डॉगस्कॉड पथकावरोबरच घटना स्थळाचे ठसेही घेण्यात आले. या प्रकरणी आकाश अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर हे करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default