औरंगाबाद हादरले ; सुरक्षा रक्षकाला ठार मारून जबरी चोरी

फुले शाहू आंबेडकर
0

एकीकडे दिवाळीची  धामधूम, फटाक्यांची आतषबाजी आणि सर्वत्र हर्षोल्लास असताना मध्यवस्तीत असलेल्या मोंढा भागात खूनाची  घटना घडल्याने एकप्रकारे शहर हादरले आहे. सेक्युरिटी गार्डला  बेदम मारहाण करून चोरी केल्याची घटना समोर आली असून पोलीस  आरोपींचा शोध घेत आहेत. 

शहरातील मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्रायजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली. या घटनेत बालाजी एंटरप्रायजेसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवले यावेळी त्यांचा तिथेच मृत्यू झाला. ही घटना आज (२६ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास घडल्याने मोठी खळबळ उडाली. दिवाळी पाडव्याच्या पहाटे अशाप्रकारची घटना घडल्याने औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्रायजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली. या घटनेत बालाजी एंटरप्रायजेसमध्ये पाशू (वय ७०) नावाची व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. आज सकाळी पाच वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशातून चार जणांनी जोरदार मारहाण करत पाशू यांना बांधून ठेवून चोरी केली. या दरम्यान पाशू यांचा मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून दिवाळी पाडव्याच्या पहाटे अशाप्रकारची घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default