कर्ज अन् नापिकीला कंटाळून महिलेसह एका अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

फुले शाहू आंबेडकर
0

अकोल्यातील पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत झरंडी व गावंडगाव येथे महिलेसह एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाबूसिंग चव्हाण आणि मैनाबाई जाधव असे दोघा मृतकांची नावे आहेत.

मैनाबाई जाधव व बाबुसिंग चव्हाण या दोघांकडे प्रत्येकी तीन एकर शेती आहे. दोघे शेतकऱ्यांनी कर्ज काढून यंदाही विविध पिकांची पेरणी केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कर्जाची परतफेड कशी होईल याचा धसका घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. 

गावंडगाव येथील मृतक मैनाबाई जाधव हिने विहिरीत उडी घेऊन, तर झरंडी येथील मृतक बाबूसिंग चव्हाण यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळतात ठाणेदार योगेश वाघमारे व सहकारी बाळकृष्ण येवले, भगवंत शिंदे, महादेव बाप्पू, ज्ञानेश्वर गीते, सुरेश चव्हाण आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठले व पंचनामा केला.

बीडमध्ये शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, बीडमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. शेतात लावलेलं सोयाबीन परतीच्या पावसाने मातीमोल झालं, तब्बल 2 एक्कर मध्ये सोयाबीनच्या लागवडीसाठी केलेली मशागत बियानाचे पैसे आणि ऐन दिवाळीत जेव्हा सोयाबीन  विकून घेतलेली कर्ज फेडायची वेळ आली त्याच वेळी परतीच्या पावसाने घात केला आण सर्व सोयाबीनचा अक्षरश: डोळ्यासमोर चिखलात गेलं.

त्यामुळे आता घेतलेलं कर्ज कसं भागवायचं ? या विवंचनेतून एका 31 वर्षीय तरुण शेतकऱ्याने  आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बीडच्या केज तालुक्यातील जोला या गावात घडली आहे. तर आमचं 2 एकर सोयाबीन गेलं म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचललं म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने एकच टाहो फोडला, त्यामुळे ऐन तरण्याबांड शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला असून संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default