आमदार पाटलांना लगावला खोचक टोला
कार्यकर्त्यांना घेवून जाण्यासाठी गाड्यांची आवश्यकता नाही. कार्यकर्त्यांच्या मनात आतून भावना असल्या पाहिजे असा खोचक टोलाही ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे बंधू शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना लगावला आहे. दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते मुंबईत जाऊ शकले नाहीत. त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे वडील कट्टर शिवसैनिक स्व. आर. ओ. पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पाचोरा शहरात भव्य अशा योग शिबिराच आयोजन केल्याचे पाहायला मिळाले. पाच दिवसीय योग शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
चारशे रूपये रोजंदारीने मुंबईला पाठविले
जे निष्ठावान शिवसैनिक आहे. त्यांना मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी गाडी घोडीची कुठलीही आवश्यकता नाही; असे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे मुंबईच्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर बसेस तसेच वाहनांमधून कार्यकर्त्यांना मुंबईच्या मेळाव्यासाठी नेले जात आहे. तब्बल ४०० रुपये रोजंदारी ही मेळाव्यासाठी जाणाऱ्या नागरिकांला दिली जात असल्याची शोकांतिका असून असे दसरा मेळाव्याला यापूर्वी कधी घडले नव्हते; अशी टीका उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिंदे गटात सहभागी झालेल्या त्यांचे बंधू आमदार किशोर पाटील यांच्यासह इतर आमदारांवर केली आहे.
