महावितरणने थकित बिल असलेल्या ग्राहकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत योजनेचा लाभ वीज बिल थकलेल्या ग्राहकांना घेता येणार आहे. ज्या वीज बिल थकीत ग्राहकांचे मीटर्स वीज वितरण विभागातर्फे काढून टाकण्यात आले आहे; अशा ग्राहकांना वीज वितरण विभागातर्फे अनोख्या पद्धतीने योजना आखून सुलभतेने वीज बिल भरण्यास सुवर्णसंधी देण्यात आली आहे.
३० टक्के रक्कम भरणे आवश्यक
थकलेल्या वीज बिलावर आकारण्यात येणाऱ्या व्याजात देखील वीज वितरण विभागातर्फे सुट देण्यात येणार आहे. परंतु यासाठी कमीत कमी 30 टक्के रक्कम भरणे आवश्यक असणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर थकलेले विज बिल वीज वितरण कार्यालयाशी संपर्क करून भरावे असे आवाहन देखील वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना करण्यात आले आहे.
