बँकेतून निघताच पाठलाग सुरू; संधी साधून पावणे पाच लाख केले लंपास, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर : बँकेतून पैसे काढणाऱ्या व्यापाऱ्याच्या दिवाणजीचा चोरट्यांनी नकळत पाठलाग केला. दिवानजी आपली दुचाकी उभी करून मित्राच्या ऑफिसमध्ये जाताच आरोपीने संधी साधून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली चार लाख 75 हजार रुपये असलेली बॅग  लंपास केली. मात्र ही सगळ घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.
सीसीटीव्हीमध्ये  दिसणारे हे दोन चोरटे शातीर आहेत. ज्या गाडीच्या डीक्‍कीमध्ये चार लाख 75 हजार ठेवले होते. त्या गाडीच्या जवळपास एक हेल्मेट घालून फोनवर बोलत उभा होता. तर दुसरा आजूबाजूला नजर ठेवून होता. या दोघांनीही आधीच सगळी रेकी केली होती. एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याचा दिवाणजी  बँकेमध्ये चेक घेऊन पैसे काढायला गेला ते यांनी बघितले. तो पैसे काढून बँकेतून निघताच त्याला माहित होणार नाही, अशा प्रकारे त्यांनी याचा पाठलाग केला.

अन्‌ ते सुसाट वेगाने फरार

दिवानजी आपली दुचाकी उभी करून बाजूला असलेल्या मित्राच्या कार्यालयात गेला. मात्र तेवढ्यातच आपली गाडी काही अंतरावर उभी करून चोरटे त्याच्या गाडीजवळ आले. त्याच्या गाडीजवळ फोनवर बोलत असल्याच नाटक करत गोल गोल फिरले आणि संधी साधून या गाडीची डिक्की उघडली. पैशांची बॅग घेऊन सुसाट पळाले. हे सगळं दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस आता या सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default