पुण्यात सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून गोळीबार

फुले शाहू आंबेडकर
0
पुणे: सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. कात्रज येथील दत्तनगर परिसरात ‘श्री मल्हार ज्वेलर्स’ नावाची सराफी पेढी आहे. सराफी पेढीचे मालक रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, रात्री अकरा वाजता दुचाकीवरून दोघेजण दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीने आले होते.
तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानातील अलार्म वाजला. त्यामुळे नागरिक सतर्क झाले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default