साक्री तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी कुंभार वस्ती या ठिकाणी पणत्या बनवणाऱ्या कुंभाराच्या घराला रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोड बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने परिसरातील नागरिकांनी घरात असलेल्या सर्व कुटुंबियांना तात्काळ बाहेर काढले.
आगीच्या रौद्ररूपात पाच घरे जळाली
आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले व यामध्ये जवळपास चार ते पाच घर जळून खाक झाले आहेत. या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ऐन दिवाळीच्या दिवशीच नुकसानग्रस्त कुटुंबीयांना बेघर होण्याची वेळ ओढावली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत देऊन दिलासा द्यावा; अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबीयांतर्फे करण्यात येत आहे.
