सिधोर, प्रतापगड येथील मसीर खान (वय १९) हा ट्रकवर क्लीनर म्हणून कामाला होता. तो ( गुजरात - यवतमाळ ट्रकवरील चालकासोबत रविवारी दुपारच्या सुमारास जात असताना रात्री दीडच्या सुमारास हॉटेल वेस्टर्न येथे थांबून आराम केला. मात्र, सकाळी ट्रकचालक मोहम्मद ईसा लियाकत अली यांना मसीर खान हा तरुण दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला.
अन् तो आढळला मृतावस्थेत
शोध घेत असताना हॉटेलमोरील जितू त्र्यंबक झोपे यांचे शेतातील झाडावर फुलगाव शिवारात निंबाच्या झाडावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्या अवस्थेत आढळून आला. ट्रकचालक मोहम्मद ईसा लियाकत अली यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी मधुकर भालशंकर तपास करीत आहेत.
