सुमित बाबू परदेशी (रा. पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २ ऑक्टोबर रोजी आंबेगाव येथील लक्ष्मी गार्डन सोसायटी भागात घरफोडीची घटना घडली होती. याबाबत कलाकार तरुणीने फिर्याद दिली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस चोरट्याचा शोध घेत होते. पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर संशयित व्यक्ती दिसून आली. परिसरातील इतर सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्यानुसार परदेशी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सुमित याच्याकडून गुन्ह्यातील २८ तोळे दागिने आणि रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त सागर पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार गणेश भोसले, मंगेश पवार, हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली
