चौघा भावांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू, तळ्यात आंघोळी गेले असता घडली घटना

फुले शाहू आंबेडकर
0
शिर्डी : विजेचा शॉक  लागून एका कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना अहमदनगरमध्ये समोर आली आहेत. विद्युत तारेला चिकटून चार लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील येठेवाडी येथे ही घटना घडली आहे.

एकाच कुटुंबातील चार मुलं घराजवळ खेळत होती. दर्शन, विराज,अनिकेत,ओंकार हे येठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. हे चौघे शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी गेले.

दुपारच्या वेळी ते खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, अंघोळ करत असताना तळ्यावरून गेलेल्या तुटलेल्या वीजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला

मात्र वादळी वाऱ्याने तुटलेल्या विजेच्या तारेमध्ये प्रवाह सुरूच होता. चिमुकल्यांना याबाबत काहीही कल्पना नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार मुलांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

मृत मुलांची नावं

१. दर्शन अजित बर्डे (वय ६)

२. विराज अजित बर्डे (वय ५)

३. अनिकेत अरुण बर्डे (वय ६)

४. ओंकार अरुण बर्डे (वय ७)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default