स्मशानभूमी नाही म्हणून नदीपात्रात चिता पेटवली अन् नदीला पूर आल्याने सगळंच बिनसलं...

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद : राज्यभरात परतीचे पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, तर शेतकऱ्यांचे ऐन काढणीला आलेली पिकं पावसामुळे मातीमोल झाली आहेत. या पावसाचा  फटका सर्वांनाच बसला आहे.
मात्र, एका मृतदेहाची देखील पावसामुळे हेळसांड झाल्याची घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील एका महिलेचे निधन झाले. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदीपात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. परंतु, काही वेळातच नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने 
कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथे स्वतंत्र स्मशानभूमी नाही. गावाशेजारील अंजना नदीच्या पात्रालगतच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र, मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने मृतदेह अखेर पुर्णपणे जळला गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default