शहरातील दंगलग्रस्त कॉलनीत मुदीर कादीर खान हा तरुण सारा हॉस्पिटल येथे नोकरीस आहे. त्यांच्या रुग्णालयात कोविडचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. दि. 2 एप्रिल रोजी शोहेब पटेल रा. नाचनखेडा ता. जळगाव यांचे नातेवाईक शैहनाजबी पटेल या दि. 2 एप्रिल 2021 रोजी कोविडच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्या. परंतु त्यांच्या नाकात फंगल ईन्फेशन वाढत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होती.
त्यानुसार डॉ. सरोदे यांच्याकडे त्यांच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पुढील उपचारासाठी त्यांना पुन्हा सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेसह उपचारापोटी रुग्णालयाकडून त्यांचे बिल सुमारे 1 लाख 71 हजार इतके काढले. परंतु दि. 14 एप्रिल रोजी शोहेब पटेल यांनी मुदीर खान यांना बिल कमी करण्यासाठी दमदाटी करीत शिवीगाळ केली.
हॉस्पिटलची केली होती तोडफोड
शोहेब पटेल याने रुग्णालयाची वृत्तपत्रात खोटी बातमी देवून बदनामी करेल अशी धमकी देवून त्याच्यापोटी पाच लाखांची खंडणी मागितली. याबाबत खान यांनी लागलीच हॉस्पिटलचे डॉ. मिनाज पटेल यांना फोनवरुन माहिती दिली. त्यानंतर देखील पटेल यांच्याकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली.
प्रकरण मिटविण्यासठी मागितली खंडणी
रुग्णालयातील रुग्णांचे नुकसान टाळण्यासाठी हॉस्पिटलने काढलेले 1 लाख 45 हजारांचे बिल कमी करुन ते 60 हजार इतके केले. त्यानंतर देखील दि. 16 एप्रिल रोजी पटेल यांनी वृत्तपत्रात खोटी बातमी दिली. दि. 23 एप्रिल रोजी शोहेब पटेल याने हॉस्पिटलमध्ये येवून पाच लाखात प्रकरण मिटवा, अन्यथा मीडियात अशीच बदनामी करुन त्यांच्याकडून पैशांची मागणी होवू लागली.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून न्यायालयात दावा दाखल केले होता. त्यानुसार न्यायालयाने दि. 20 ऑक्टोंबर रोजी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने त्यानुसान संशयित शोहेब पटेल याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
