आज मी मरेल व तुलाही मारेल..धमकी देत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद : तू माझी नाही तर, कुणाचीही होऊ देणार नाही व आज मी मरेल व तुलाही मारेल; अशी धमकी देत अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे उघडकीस आली आहे अल्पवयीन 17 वर्षीय मुलीच्या परिचयाचा शिवा हा मुलगा पिडीत मुलीच्या घराजवळ येऊन माझ्यासोबत रिलेशनमध्ये ये; असे म्हणत त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला नकार देताच त्याने मुलीचा हात पकडून वाईट उद्देशाने जवळ ओढले. यानंतर तू माझी नाही तर कुणाची नाही. असे म्हणत वाईट कृत्य केले आरडाओरड करताच गेला पळून मुलीने आरडाओरड केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर पुन्हा बजाजनगरमध्ये मुलीच्या पाठीमागे येऊन मी मरेल आणि तुलाही मारेल. अशी धमकी देत निघून गेला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default