लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हाटकरवाडी येथील गितांजली हाके हीचा विवाह भोकर येथील कर सल्लागार असलेल्या प्रकाश श्रीरामे या व्यक्तीशी 20 मार्च 2006 मध्ये झाला होता. त्यांना15 वर्षाचा मुलगा आणि 10 वर्षाची मुलगी आहे. एक महिन्यापुर्वी दोघांचे भांडण झाले होते. त्यामुळे दोघीही वेगवेगळे राहत होते.
काल पत्नी प्रकाश श्रीरामे यांच पत्नी गितांजली, प्रियकर बालाजी जाधव, दिलीपसिंग पवार, आवतारसिंग रामगाडीया आणि अमोल बुक्तरे यांनी नांदेड येथून अपहरण केलं. यावेळी पत्नी गितांजलीने प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी पतीला जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केली. त्यानंतर पतीला औंढा जाणाऱ्या रस्त्यावर नेऊन गाडीतून उतरून टाकले.
श्रीरामे यांनी तातडीने भाग्यनगर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ही तातडीने तपास चक्रे फिरवत पत्नी गितांजली, प्रियकर बालाजी जाधव याच्यासह चारजणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पत्नीनेच पतीचं अपहरण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या या घटनेनं खळबळ उडाली. या हैराण करणाऱ्या घटनेचा तपास भाग्यनगर पोलीसांनी फिल्मीस्टाईलमध्ये दोन तासामध्ये लावला आणि या घटनेतील आरोपींना अटक केली आहे.
