साडेचार लाखाचा गांजा जप्त; दहिफळ खंदारे शिवारात पोलिसांची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
जालना : मंठा तालुक्‍यात दहिफळ खंदारे शिवारात शेतात गांजाची लागवड केली होती. हा गांजा पोलिसांनी  जप्‍त केला असून साधारण साडेचार लाख रूपयांचा गांजा पोलिसांनी हस्‍तगत केला आहे.
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे शिवारातील गट नंबर 367 मध्ये प्रदीप थावरा राठोड या शेतकऱ्यांनी शेतातील पिकात गांजाच्या झाडांची लागवड केली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकासह कृषी आणि महसूल विभागाच्या पथकांनी कारवाई केली.

३२ किलो गांजाची झाडे

दहिफळ खंदारे शिवारातील शेतातली उभ्या पिकात असलेली तब्बल २३ मोठी झाड आढळून आल्याने पोलिसांनी ही झाडे उपटून ३२ किलो गांजा जप्त केला. मार्केटमध्ये या गांजाची किंमत अंदाजे पाच लाख रुपये असल्याची माहिती ही सामोर आली. या प्रकरणी मंठा पोलिसांनी आरोपी प्रदीप राठोड यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास मंठा पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default