याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील नवाफलीया खाटकी वाडा बगदाद येथील रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची यांच्या घराशेजारी राहणारी हुमेरा हिच्याशी शबुक्ता इरफान शेख ही भांडण करीत होते.
सदर भांडण सोडविण्यासाठी रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची गेल्या असता शबुक्ता इरफान शेख, अजमिता जावेद शेख, जावेद शेख यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच इरफान शेख याने कुर्हाडीने डोक्यावर वार करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली.
