माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

फुले शाहू आंबेडकर
0

घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरुन पाच लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी 28 वर्षीय विवाहितीचा पारनेर येथील सासरी शारिरीक व मानसिक छळ करुन तीच्या माहेरच्या लोकांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत सासरच्या पाच जणांंवर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता रविंद्र पवार, रा. कोहकडी, ता. पारनेर हल्ली राहणार ब्राम्हणी, ता. राहुरी या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सन 2018 सालापासून आम्हाला मानपान दिला नाही. तसेच तुझ्या आई वडीलांनी लग्नामध्ये हुंडा पण दिला नाही. तेव्हा तू घर बांधण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये. असे म्हणून सासरचे लोक तीचा शारिरिक व मानसिक छळ करु लागले. संगीता पवार हिचे वडील व भाऊ तीच्या सासरच्या लोकांची समजूत काढण्यासाठी आले असता सासरच्या लोकांनी मारहाण केली व म्हणाले की, तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा आणि जो पर्यत घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन येत नाही. तोपर्यत तिला सासरी घेऊन यायचे नाही. जर परत इकडे आले तर तुमचे मुडदे पाडु, अशी धमकी दिली.

त्यानंतर सन 2021 मध्ये भरोसा सेल, अहमदनगर येथे सासरच्या लोकांनी समझोता करुन संगीता हिला सासरी घेऊन गेले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये पुन्हा तीचा छळ सुरू केला. अखेर तीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत सासरा लव्हाजी सोबाजी पवार, सासू पंखाबाई लव्हाजी पवार, पती रविंद्र लव्हाजी पवार, दिर महेंद्र लव्हाजी पवार, सुरेंद्र लव्हाजी पवार सर्व रा. कोहकडी, ता. पारनेर या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. 1169/2022 भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार वाल्मीक पारधी हे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default