अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. अमळनेर- धुळे या मार्गाने ते शासकीय वाहनाने निघाले होते. दरम्यान धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले बीडीओ एकनाथ चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. गटविकास अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातस्थळ गाठले. चौधरी यांचा मृतदेह येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील होता.
