औरंगाबाद जळीतकांड प्रकरण; 'सॉरी' या शब्दाने दोन तरुण संशोधकांचा घात, पोलीस तपासात प्राथमिक माहिती समोर

फुले शाहू आंबेडकर
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी गजानन मुंडे यांनी स्वत:ला पेटवून घेत सहकारी संशोधक विद्यार्थिनीला मिठी मारल्याची खळबळजनक घटना 21 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणामुळे शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली होती.

या घटनेतील तरुणाचा त्याच दिवशी मृत्यू झाला असून तरुणीची मृत्यूची झुंज सुरू आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत असून, सॉरी या शब्दाने या दोन तरुण संशोधकांचा घात केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली 

सॉरी या दोन अक्षराच्या शब्दात खूप मोठी ताकद असते असं म्हणतात. या शब्दाने मोठ्या मोठ्या चुका माफ होतात. तर दुसरीकडे सॉरी न म्हटल्याने या दोन तरुण संशोधकांचा अशा प्रकारे दुर्दैवी घात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थ्याने जाळून घेत सहकारी संशोधक विद्यार्थिनीला कवटाळले.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, दोघांच्या पीएचडीचे मार्गदर्शक, विज्ञान संस्थेतील प्राध्यापक तसेच तरुण-तरुणीच्या मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदवले.

या तपासात एका प्राध्यापकाच्या जबाबानुसार तरुणीने फसवणूक केल्याविषयी तक्रार तरुणाने केली होती. यानंतर प्राध्यापकांनी दोघांना समोरासमोर बसून समुपदेशनही केले होते. तरुणाने तरुणीला यापुढे त्रास देणार नाही असा शब्द दिला, मात्र त्यासाठी तरुणाने एकदा सॉरी म्हणण्याची अट घातली. यावर तरुणीने आपण कोणाचीही फसवणूक केली नसल्यामुळे सॉरी म्हणण्यास नकार दिला आणि यातूनच वाद विकोपाला गेला. यानंतर 21 नोव्हेंबर रोजी हे जळीत कांड झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

एकंदरीतच या सर्व घटनेमुळे शहरासह राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रेम करावे की नाही असा प्रश्न अनेक तरुण-तरुणी समोर उपस्थित होतोय. यातच सॉरी या शब्दाने या तरून संशोधकांचा घात केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर कोणत्याही नात्यांमध्ये सॉरी या शब्दाचे खूप महत्त्वाचे स्थान असल्याचे दिसून येतंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default