चोपडा ते पुणे जाणाऱ्या एमएच 09 ईएम 3690 क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्समधून काही जण बेकायदेशीरपणे गांजा नेत असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.
त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने काल दि.10 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फागणे (ता.धुळे) शिवारात ट्रॅव्हल्सला थांबविले. तिघांना संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी सुरेश असरद छाजेड (वय 25 रा.बालमटाकळी ता. शेवगाव जि. सोलापूर), आनंद नागनाथ कापुरे (वय 19 रा. कोळेगाव ता. मोहोळ जि. सोलापूर) व सुनिल मद्रास पवार (वय 25 रा. महादेव दोंदवाड ता. शिरपूर) अशी नावे सांगितली.
त्यांच्याकडील बँगांची तपासणी केली असता एका विमल पानमसाला नावाच्या मोठ्या झोल्यामध्ये 11 किलो ओला गांजा मिळून आला. 56 हजार 990 रूपये किमतीचा हा गांजा जप्त करण्यात आला. तिघांवर एनडीपीएस कायद्याप्रमाणे धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
