शिरपूर/प्रतिनिधी: 20 चा महाराष्ट्रातील समितीत आ.अमरीशभाई पटेल ह्याचं समावेश सर्वाना सांगायला अत्यंत समाधान वाटते की जी-२० परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे 'प्रदेश संयोजक' म्हणून राजेश पांडे नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठीचे पत्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडून नुकतेच मिळाले.
वसुधैव कुटुम्बकम् :'एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य' या संकल्पनेवर आधारित असलेल्या भारत देशाला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जी२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळालं आहे. हा फक्त नेत्यांचा बहुमान नाही तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी जागतिक पटलावर सुवर्ण संधी निर्माण करून देणारा हा क्षण आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे लोकसहभाग आणि जनजागृतीसाठी जी २० च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजप समिती कार्यरत करण्यात आली आहे आणि या समितीच्या 'प्रदेश संयोजक' म्हणून मा. राजेश पांडे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील, *आमदार अमरीशभाई पटेल,* आमदार निरंजन डावखरे, शायना एन सी, खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ.अजित गोपछडे, प्रदीप पेशकर, श्वेता शालिनी, दयाशंकर तिवारी या सदस्यांचा समावेश आहे.
मा. राजेश पांडे व समिती सदस्य ह्यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविली, त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. संघटन आणि संवाद या सूत्राभोवती सलग ४० वर्ष कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याचा अनुभव याकामी नक्कीच उपयोगी येईल. असे प्रतिपादन राजेश पांडे ह्यांनी केले
राज्यभरात होणारे जी२० परिषदेचे कार्यक्रम करताना रचनात्मक लोकसहभाग, युवा वर्गामध्ये आगामी संधींबद्दल जनजागृती, शिक्षण, उद्योग क्षेत्रात तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संधी मांडणे यावर आमचा भर असेल.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती होत असताना त्याचा सुयोग्य संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणे, हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची आम्हाला मदत लागणार आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी.. प्रत्येक भारतीयाने जी-२० च्या निमित्ताने राजकारण, पक्षभेद बाजूला ठेवून यात सहभागी होवूयात.
