बाल संगोपन योजनेच्या लाभ अनाथ किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही. जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके. एक पालक असलेली व कौटुंबिक संकटात असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, आदी कारणांमुळे विघटित झालेल्या, एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एचआयव्ही ग्रस्त/बाधित बालके, तीव्र गतिमंद बालके दोन्ही पालक दिव्यांग आहेत अशी बालके. पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अति हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलिस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, शाळेत न जाणारे बाल कामगार, (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले) जे ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांना बाल कल्याण समितीच्या मंजुरीने लाभ देण्यात येतो.
अनाथ बालकांना मिळणार आधार; लाभासाठी पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तीची पोलिसांत तक्रार करावी
बुधवार, डिसेंबर २८, २०२२
0
धुळे : महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून ० ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी अर्ज दाखल करताना कोणत्याही मध्यस्थाने पैशांची मागणी केल्यास अशा व्यक्तीबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी केले आहे.
Tags
