मुंबईहून पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सकाळी सात वाजेच्या सुमारास कार व ट्रॅंकरचा अपघात झाला. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या टॅंकरने कारला जोरदार धडक दिल्याने यात पारोळा नगरपालिकेचा अभियंता कुणाल सौपुरे (वय ३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा) व एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉ. निलेश मंगळे (वय ३५, रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप पवार (वय ३७) हा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
सुटीमुळे मुंबई फिरायला गेले होते तिघे
कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. पारोळा नगरपालिकेत अभियांता असल्याने सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव होता. तर डॉ. निलेश मंगळे हा उत्तराखंड येथे एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याचे जुळे दोन मुले आहेत. रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना काळाने घाला घातला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.
