मला त्यावेळी राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. आता मुख्यमंत्री शिंदे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले. भाजपकडं नैतिकता हा विषयचं नाही. ही लोकं निगरगट्ट आहेत. नैतिकतेच्या आधारावर हे सरकार आलेलं नाही. विरोधी पक्ष म्हणून मागणी करणं हे आमचं काम आहे. त्यासाठी संघर्ष करणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरच आक्षेप घेतला आहे. प्रदेशाध्यक्षांनी आक्षेप घेतल्यामुळं त्याची पूर्तता करण्यासाठी भाजपनं प्रयत्न करावा. ८६ कोटी रुपयांचे भूखंड दोन कोटी रुपयांत देण्याबाबत आक्षेप त्यांच्यावर आहे. नियम न पाळता भूखंड दिल्याचं रेकॉर्डवर आहे.
हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ठ होतं. अशावेळी एखादा निर्णय मंत्र्यांनी घेणं हे अतिशय चुकीचं आहे. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा निर्णय घेतला. हाच मुळात चुकीचा असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केलाय. या भूखंडाबाबत लिलाव काढता आले असते. अन्य मार्गानं किमती ठरविता आल्या असत्या. कोणतीही प्रक्रिया न राबविता आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुख्यमंत्र्यांनी हे काम केलंय, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली